Jump to content

मिशेल ओबामा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
मिशेल ओबामा
मानव
लिंगमहिला संपादन
नागरिकत्वअमेरिकेची संयुक्त संस्थाने संपादन
स्थानिक भाषेतील नावMichelle Obama संपादन
जन्म-नावMichelle LaVaughn Robinson संपादन
दिलेले नावMichelle संपादन
आडनावCiobama संपादन
जन्म तारीख१७ जानेवारी 1964 संपादन
जन्मस्थानशिकागो संपादन
वडीलFraser Robinson III संपादन
आईMarian Shields Robinson संपादन
भावंडेCraig Robinson संपादन
वैवाहिक जोडीदारबराक ओबामा संपादन
अपत्यMalia Obama, Sasha Obama संपादन
नातेवाईकCapers Funnye संपादन
कुटुंबfamily of Barack Obama संपादन
मातृभाषाइंग्लिश भाषा संपादन
बोलण्याची वा लेखनाची भाषाAmerican English, इंग्लिश भाषा संपादन
लेखनाची भाषाइंग्लिश भाषा संपादन
नियोक्ताप्रिन्स्टन विद्यापीठ संपादन
निवासस्थानHyde Park, व्हाइट हाउस, South Shore, White Cloud संपादन
राजकीय पक्षाचा सभासदडेमोक्रॅटिक पक्ष संपादन
Ethnic groupआफ्रिकन अमेरिकन संपादन
धर्मUnited Church of Christ, Methodism संपादन
Artist files atSmithsonian American Art and Portrait Gallery Library संपादन
सदस्यताNational Honor Society, Trinity United Church of Christ, American Academy of Arts and Sciences संपादन
महत्वाची घटनाप्रसूती, प्रसूती संपादन
पुरस्कारGrammy Award for Best Audio Book, Narration & Storytelling Recording, National Women's Hall of Fame, honorary degree from Spelman College, BBC 100 Women, Women of the Year संपादन
अधिकृत संकेतस्थळhttps://www.obama.org/ संपादन

मिशेल रॉबिन्सन ओबामा (जानेवारी १७, इ.स. १९६४) ह्या अमेरिकेच्या प्रथम महिला (इंग्लिश: First Lady) (राष्ट्राध्यक्ष बराक ओबामांच्या पत्नि) आहेत. अमेरिकेच्या इतिहासात प्रथमच एका आफ्रिकन अमेरिकन महिलेला हा मान मिळाला आहे.

मिशेल रॉबिन्सनचा जन्म व बालपण शिकागो शहरात झाले. त्यांनी प्रिन्सटन विद्यापीठ व हार्वर्ड विधी विद्यालयामधून शिक्षण घेतले आहे. शिक्षणानंतर शिकागोमध्ये नोकरी करत असताना त्यांची बराक ओबामांशी ओळख झाली. बराक व मिशेल ह्यांनी १९९२ साली लग्न केले. ओबामा दांपत्याला मलिया आणि साशा ह्या दोन मुली आहेत.

२००८ सालच्या अध्यक्षीय निवडणुकीमध्ये मिशेल ओबामांनी आपल्या नवऱ्याला निवडुन आणण्यात मोठा वाटा उचलला. डेमोक्रॅटिक पक्षाच्या बैठकीदरम्यान त्यांनी दिलेल्या भाषणाला चांगला प्रतिसाद मिळाला.

प्रथम महिला ह्या पदावर मिशेल ओबामांनी जगभरातील लोकांना मोहून टाकले आहे. त्यांचे प्रभावशाली व्यक्तिमत्त्व, उच्च शिक्षण, समाजकार्याची कळकळ इत्यादी बाबींच्या जोरावर त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांचे उत्कृष्ट कपडे हा फॅशन जगतातील एक मोठा चर्चेचा विषय झाला आहे.