ओरेगन
| ओरेगन Oregon | |||||||||||
| |||||||||||
| अधिकृत भाषा | इंग्लिश | ||||||||||
| राजधानी | सेलम | ||||||||||
| मोठे शहर | पोर्टलंड | ||||||||||
| क्षेत्रफळ | अमेरिकेत ९वा क्रमांक | ||||||||||
| - एकूण | २,५५,०२६ किमी² | ||||||||||
| - रुंदी | २४० किमी | ||||||||||
| - लांबी | ५८० किमी | ||||||||||
| - % पाणी | २.४ | ||||||||||
| लोकसंख्या | अमेरिकेत २७वा क्रमांक | ||||||||||
| - एकूण | ३८,३१,०७४ (२०१० सालच्या गणनेनुसार) | ||||||||||
| - लोकसंख्या घनता | १५.४/किमी² (अमेरिकेत ३९वा क्रमांक) | ||||||||||
| संयुक्त संस्थानांमध्ये प्रवेश | १४ फेब्रुवारी १८५९ (३३वा क्रमांक) | ||||||||||
| संक्षेप | US-OR | ||||||||||
| संकेतस्थळ | www.oregon.gov | ||||||||||
ओरेगन (इंग्लिश: Oregon, {
उच्चार ) हे अमेरिकेचे एक राज्य आहे. अमेरिकेच्या वायव्य (पॅसिफिक नॉर्थवेस्ट) भागात वसलेले ओरेगन क्षेत्रफळाच्या दृष्टीने अमेरिकेमधील नववे तर लोकसंख्येच्या दृष्टीने २७व्या क्रमांकाचे राज्य आहे.
ओरेगनच्या पश्चिमेला प्रशांत महासागर, पूर्वेला आयडाहो, दक्षिणेला कॅलिफोर्निया व नेव्हाडा तर उत्तरेला वॉशिंग्टन ही राज्ये आहेत. सेलम ही ओरेगनची राजधानी तर पोर्टलंड हे सर्वात मोठे शहर आहे.
बर्फाच्छादित पर्वतरांगा, लांबलचक समुद्र किनारा, अनेक नद्या व सरोवरे ह्यांमुळे ओरेगनला नैसर्गिक सौंदर्य लाभले आहे. ह्या राज्याचा जवळपास अर्धा भाग जंगलाने व्यापला आहे. ओरेगन हे अमेरिकेमधील सर्वात हरित राज्य मानले जाते.
मोठी शहरे
[संपादन]अर्थव्यवस्था
[संपादन]ओरेगनची अर्थव्यवस्था नैसर्गिक संसाधने, तंत्रज्ञान आणि उत्पादन क्षेत्रावर आधारलेली आहे. एकेकाळी येथील अर्थव्यवस्था प्रामुख्याने लाकूड आणि कृषी क्षेत्रावर अवलंबून होती. आधुनिक काळात माहिती तंत्रज्ञान हा येथील मुख्य आधार आहे. पोर्टलँडच्या पश्चिमेकडील उपनगरांतील असलेल्या सिलिकॉन फॉरेस्ट मुळे ओरेगन हे संगणकीय चिप्स आणि सॉफ्टवेर उत्पादनाचे महत्त्वाचे केंद्र झाले आहे. या व्यतिरिक्त ओरेगनमध्ये नाइकी आणि कोलंबिया स्पोर्टसवेर यांसारख्या मोठ्या बहुराष्ट्रीय कंपन्यांची मुख्यालये आहेत. कृषी क्षेत्रात ओरेगन हे हेझलनट, वाईन आणि दुग्धजन्य पदार्थांच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध असून, येथील पर्यटन क्षेत्रही राज्याच्या महसुलात मोठी भर घालते.
गॅलरी
[संपादन]- ओरेगन स्वागत फलक.
- ट्रिलियम सरोवर.
- ओरेगनमधील प्रमुख रस्ते व महामार्ग.
- ओरेगन राज्य संसद भवन.
- ओरेगनचे प्रतिनिधित्व करणारे २५ सेंट्सचे नाणे.
बाह्य दुवे
[संपादन]| विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |

