Jump to content

फ्रेंच भाषा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
फ्रेंच
Français
स्थानिक वापर जगातील २९ देश व १३ प्रदेश
प्रदेश युरोप, उत्तर अमेरिका, आफ्रिका, ओशनिया
लोकसंख्या २० कोटी[१][२] आणि जगभरात अंदाजे ५०० दशलक्ष फ्रँकोफोन्सद्वारे (2000)[३][४]
क्रम १४
लिपी लॅटिन
अधिकृत दर्जा
प्रशासकीय वापर
भाषा संकेत
ISO ६३९-१ fr
ISO ६३९-२ fra
ISO ६३९-३ fra
भाषिक प्रदेशांचा नकाशा
फ्रेंच भाषा बोलली जाणारे प्रदेश.गडद निळा-फ्रेंच भाषिक, निळा-अधिकृत, फिकट निळा-सांस्कृतीक, हिरवा-अल्पसंख्यांक

फ्रेंच (Français) ही जगातील एक प्रमुख भाषा आहे. जगातील ५४ देशातील सुमारे ३० कोटी लोक (प्रथम व द्वितीय-प्रभुत्व) फ्रेंच बोलू शकतात.[५] प्राचिन लॅटिन भाषेपासून फ्रेंचची निर्मिती झाली असून. २९ देशांची ती अधिकृत राजभाषा आहे व इंग्रजी नंतर सर्वात जास्त शिकली जाणारी परदेशी भाषा आहे. ही भाषा इंग्रजीसारखे लॅटिन लिपी वापरून लिहिली जाते.

इतिहास

[संपादन]

फ्रेंच ही भाषा लॅटिन या भाषेपासून आली आहे. लोहयुगादरम्यान गॉल या प्रदेशात रोमान राज्यामुळे हळूहळू लॅटिन बोलण्यात आली. जेव्हा गॉलमधील लोक लॅटिन शिकायला आणि बोलायला लागले, तेव्हा गॉलमध्ये बोलल्या जाणाऱ्या लॅटिनमध्येही एक स्थानिक भाषिक वैशिष्ट्य विकसित व्हायला लागले, जसे इतर प्रदेशांतही होत होते. ही स्थानिक बोलीभाषा नंतर गालो-रोमॅन्स भाषांच्या गटात विकसित झाली, ज्यात फ्रेंच ही भाषा समावेश आहे.

गॉली भाषेचे मोठ्या प्रमाणावर रोमनकरण झाले असूनही, ती आजच्या फ्रान्सच्या प्रदेशात इ.स. ६व्या शतकापर्यंत टिकून राहिली असावी. गॉली भाषा काही काळ लॅटिनसोबत सहअस्तित्वात राहिली आणि तिने लॅटिनला, तसेच नंतरच्या गालो-रोमान्स भाषांना, अनेक शब्द दिले (उदा. oui, ‘हो’). गॉलीच्या प्रभावामुळे काही ध्वन्यात्मक बदलही झाले.

ध्वनीशास्त्र

[संपादन]
ओष्ठ्य दन्त्य/वर्त्स्य तालव्य(-वर्त्स्य) कण्ठ्य प्रतिजिह्विक
मध्यवर्ती ओष्ठ्य
अनुनासिक m n ɲ (ŋ)
स्पर्श अघोष p t k
घोष b d ɡ
ऊष्मन् अघोष f s ʃ ʁ
घोष v z ʒ
अन्तस्थ स्पष्ट l j
ओष्ठ्यीकृत ɥ w
स्वर
मौखिक
अग्र मध्य पश्च
अवर्तुलित वर्तुलित
संवृत i y u
अर्ध-संवृत e ø ə o
अर्ध-विवृत ɛ, (ɛː) œ ɔ
विवृत a (ɑ)
अनुनासिक
अग्र पश्च
अवर्तुलित वर्तुलित
अर्ध-विवृत ɛ̃ (œ̃) ɔ̃
विवृत ɑ̃

संदर्भ

[संपादन]
  1. ↑ "Estimation du nombre de francophones dans le monde en 2005". 2013-01-17 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2010-04-21 रोजी पाहिले.
  2. ↑ Jacques Leclerc. "Francophonie (Qu'est-ce que la?)". 2011-06-23 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2010-04-21 रोजी पाहिले.
  3. ↑ Jacques Leclerc. "Francophonie". 2011-06-23 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2010-04-21 रोजी पाहिले.
  4. ↑ ethnologue. "French: a language of France". Ethnologue: Languages of the World (14th ed.).
  5. ↑ "Most Widely Spoken Languages". 2011-09-27 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2010-04-21 रोजी पाहिले.

हे सुद्धा पहा

[संपादन]
विक्शनरी
विक्शनरी