Jump to content

गरज

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
गरज
उपवर्गprerequisite, गुणधर्म संपादन

समाधानाच्या अभावाची जाणीव म्हणजे गरज होय. [१]


मानवी गरजा वाढण्याचे मुख्य दोन कारणे आहेत.

  • नवीन शोध आणि नवप्रवर्तनामुळे राहणीमानाचा दर्जा सुधारण्याची इच्छा.
  • लोकसंख्या मध्ये झालेली वाढ

गरजांची वैशिष्ट्ये

[संपादन]

अमर्यादित गरजा

[संपादन]

गरजा या पुन्हा पुन्हा निर्माण होत असून,त्या कधीही न संपणाऱ्या असतात.एक गरज पूर्ण करेपर्यंत दुसरी गरज पुन्हा निर्माण होते. गरजा सातत्याने निर्माण होतात.

पुनरुद्भवी गरजा

[संपादन]

काही गरजा पुन्हापुन्हा निर्माण होतात.तर काही गरजा प्रसंगानुरूप निर्माण होतात.

वयानुसार गरजा

[संपादन]

वेगवेगळ्या गरजा व त्यांचे समाधान वयोपरत्वे बदलत असते.

लिंगानुसार गरजा

[संपादन]

स्त्री पुरुषांच्या गरजा अवशक्यता नुसार बदलतात.

पसंतीनुसार गरजा

[संपादन]

प्रत्येक व्यक्ती आपापल्या सवयी,आवडीनिवडी आणि पस पसंतीनुसार गरजांची निवड करतो.

हवामानानुसार गरजा

[संपादन]

गरजा या वेगवेगळ्या हवामानानुसार, ऋतुमानानुसार बदलत असतात.

संस्कृतीनुसार गरजा

[संपादन]

गरजा या संस्कृतीनुसार बदलत असतात.गरजांच्या निवडीवर संस्कृतीचा प्रभाव पडतो. विशेषतः आहार,वेशभूषा इत्यादी.

गरजांचे वर्गीकरण

[संपादन]

गरजांचे वर्गीकरण खालीलप्रमाणे करता येते.

आर्थिक आणि अर्थिकेत्तर गरजा

[संपादन]
  • ज्या गरजांची पूर्तता पैशांच्या साहाय्याने केली जाते त्यांना आर्थिक गरजा असे म्हणतात.वेयक्तिकरित्या त्यांचा मोबदला पैशांच्या स्वरूपात दिला जातो.उदा. अन्न,औषध इत्यादी.
  • ज्या गरजा पैशाशिवाय पूर्ण करता येतात त्या म्हणजे आर्थिकेत्तर गरजा होय.उदा.हवा,सूर्यप्रकाश इत्यादी.

वैयक्तिक गरजा आणि सामूहिक गरजा

[संपादन]
  • ज्या गरजा वेयक्तिक पातळीवर पूर्ण केल्या जातात त्यांना वैयक्तिक गरजा असे म्हणतात.
  1. ↑ गरजा